

भीष्म १०८ सोमयाग प्रकल्प

सोमयाग यज्ञ आयोजनाविषयी महत्त्वपूर्ण माहिती
आपण सोमयाग यज्ञाचे आयोजन करू इच्छिता का ?
आपल्याला एका दैवी उपक्रमाचे आयोजन करावयाचे आहे का ?
आपल्याला एक अभूतपूर्व ईश्वरी कार्य करावयाचे आहे का ?
वेद हे सर्व सृष्टीचे मूलभूत ग्रंथ आहेत. विश्वाचे आणि संपूर्ण सृष्टीचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी वेदांमध्ये संपूर्ण ज्ञान आहे. ते देवाचे शब्द आहेत, आणि म्हणूनच त्यांना अपौरुषेय (निराकार) म्हटले जाते. वेदांमधील ज्ञानाला श्रुति म्हणतात. श्रुतीवर आधारित केलेल्या यज्ञांना श्रौत यज्ञ म्हणतात. हे यज्ञ करण्याचा अधिकार फक्त अग्निहोत्री ब्राह्मण देवतेला आहे, ज्यांच्या घरात अग्नी नारायणाचा दिवा २४ तास जळतो. आज संपूर्ण भारतात अशा फक्त २१२ अग्निहोत्री ब्राह्मण देवता उपलब्ध आहेत.
यज्ञ हे एक प्राचीन शास्त्र आहे. जगाच्या कल्याणासाठी श्रौत यज्ञ केले जात होते. सृष्टी आणि ऋतू चक्र यांचे संचालन करणे, विपुल पर्जन्य वृष्टी, धन-धान्य आणि पशु वृद्धी आणि सरतेशेवटी मानवाच्या आनंदात उत्तरोत्तर भर टाकणे ही श्रौत यज्ञांची मुख्य उद्दिष्टे आहे. मानसिक, भावनिक आणि सामाजिक शांतता राखण्यासाठी, वातावरण आणि पर्यावरण शुद्ध करण्यासाठी, ओझोन पातळी राखण्यासाठी, वातावरणातील विघातक जंतू आणि विषाणू नष्ट करण्यासाठी श्रौत यज्ञ केले जातात.


वैदिक काळापासून सुरू असलेल्या परंपरेनुसार आणि वैदिक नियमांनुसार अर्थात श्रुतीने सांगितलेल्या नियमांनुसार सोमयाग यज्ञाचे आयोजन करणे हे एक अत्यंत विलक्षण आणि दैवी कार्य आहे. जन्म जन्मांतरीचे पुण्य आपल्या पाठी असेल तरच आपल्या हातून सोमयाग यज्ञाचे आयोजन होऊ शकते. ज्यांची सनातन वैदिक हिंदू भारतीय संस्कृतीवर श्रद्धा आहे, ज्यांना आपल्या आयुष्यात काही तरी भव्य दिव्य असे ईश्वरी कार्य करावयाचे आहे आणि आपल्या बरोबरच संपूर्ण विश्वाचे कल्याण साधावयाचे आहे, अशा सर्वांसाठी सोमयाग यज्ञाचे आयोजन करणे ही एक अत्यंत उत्तम संधी आहे.
सोमयाग संपन्न करण्यासाठी भीष्म फाउंडेशन कडे ब्रह्मवृंदाच्या 4 ते 5 टीम सज्ज आहेत. याचा अर्थ एका वर्षामध्ये उत्तरायणामधील 15 ते 18 आणि दक्षिणायणामधील चार म्हणजे एकूण किमान 20 सोमयाग आयोजित करता येतील. ब्रह्मवृंदांची एक टीम एका वर्षामध्ये 20 सोमयाग संपन्न करू शकेल. भीष्म फाउंडेशन एका वर्षामध्ये योजनाबद्ध रीतीने किमान 75 ते 80 सोमयाग आयोजित करू शकते.
संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी, सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय आणि याच बरोबर वैयक्तिक जीवनामध्ये स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे कल्याण व्हावे म्हणून अधिकाधिक व्यक्ती, संस्था यांनी सोमयाग आयोजित करावेत असे आवाहन आम्ही करीत आहोत. त्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी भीष्म फाउंडेशन तयार आहे.
भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम आणि विश्व मंदिर परिषद यासाठी आपल्याला सर्वतोपरी सहकार्य आणि मार्गदर्शन करण्यासाठी उत्सुक आहे. सोमयागासाठी सर्व प्रकारची व्यवस्था, यज्ञ साहित्य, ब्रह्मवृंद आणि अन्य प्रकारचे सहाय्य आणि मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे. याच बरोबर सोमयाग यज्ञासाठी आवश्यक आर्थिक निधी जमवण्यासाठी ही मार्गदर्शन व सहाय्य करेल. इच्छुकांनी त्यासाठी संपर्क साधावा.
प्रा. क्षितिज पाटुकले
संस्थापक - भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम आणि विश्व मंदिर परिषद
ईमेल आयडी :- 108somyag@bhishmaiks.org

सोमयागासाठी वैदिक यजमान
सोमयाग यज्ञ हा हजारो वर्षांपासून चालत आलेल्या वैदिक ज्ञान परंपरेनुसार संपन्न केला जातो. वेदांनाच श्रुती असे म्हटले जाते. म्हणूनच वेदांमध्ये अर्थात श्रुतींमध्ये वर्णन केलेल्या नियमानुसार केला जाणारा यज्ञ म्हणजे श्रौत यज्ञ. या श्रौत यज्ञामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ही वैदिक यजमानाची असते. पारंपारिक वेद पाठशाळेतील गुरुकुल पद्धतीप्रमाणे ज्यांनी वैदिक ज्ञान अर्थात वेदांचे आणि यज्ञांचे ज्ञान ग्रहण केले आहे आणि ज्यांच्या घरी दिवस रात्र 24 तास अग्नी अखंडपणे प्रज्वलित आहे, अशीच व्यक्ती श्रौत यज्ञाचे अर्थात सोमयागाचे वैदिक यजमान पद ग्रहण करू शकते. पूर्वीच्या काळी भारतामध्ये दरवर्षी हजारो सोमयाग संपन्न होत असत आणि त्या काळात मोठ्या प्रमाणावर वैदिक यजमान उपलब्ध होते. काळाच्या ओघामध्ये यज्ञ परंपरा लोप पावल्याने वैदिक यजमानांची संख्या रोडावत गेली. आज संपूर्ण देशामध्ये ज्यांच्या घरी 24 तास अग्निहोत्र प्रज्वलित आहे, असे केवळ 250 ते 300 इतकेच वैदिक यजमान उपलब्ध आहेत.
साधारणपणे यज्ञाच्या तीन संस्था आहेत
१) पाकयज्ञ संस्था : यामध्ये औपासना होम, वैश्वदेव, पार्वण, अष्टकाश्राद्ध, मासिकश्राद्ध, श्रवणाकर्म, शूलगव इत्यादी सात पाकयज्ञ संस्था आहेत.
२) हविर्यज्ञ संस्था : यामध्ये अग्निधान, अग्निहोत्र, दर्शपूर्णमास, अग्रायण, चातुर्मास्य, निरुढ पशुबंध आणि सौत्रामणी इत्यादी सात संस्था आहेत.
३) सोमयज्ञ संस्था: अग्निष्टोम, अत्यग्निष्टोम, उक्थ्य, षोडशी, वाजपेय, अतिरात्र आणि अप्तोर्याम या सात सोमयज्ञ संस्था आहेत.
या सर्वांमध्ये, सोम प्रधान आहे म्हणजे मुख्य हविर्द्रव्य आहे. सोमवल्ली नावाची विशेष वनस्पती आणून ती दिवसातून तीन वेळा सकाळी, दुपारी आणि रात्री चुरून त्याचा रस काढायचा आणि तो सोमरस विविध देवतांना अग्नीत अर्पण करायचा. म्हणूनच याला सोमयाग म्हणतात. या यज्ञांमध्ये चारही वेदांचे नियमित पठण केले जाते. तीन मातीची महावीर पात्रे आहेत, ज्यामध्ये अग्नी मंत्र वापरून गायीचे तूप उकळले जाते. आणि त्या तुपामध्ये गाईचे दूध आणि बकरीचे दूध मिसळले जाते, त्यानंतर 20-25 फूट उंच व्यासाची दिव्य ज्योत आकाशाकडे निघते, ज्यामुळे वातावरण आणि वातावरण शुद्ध होते.
सोमयागांचे प्रकार
अग्निष्टोम , अत्यग्निष्टोम , उक्थ्य , षोडशी, अतिरात्र आणि अप्तोयार्म - या सोमयागांचा कालावधी ६ दिवसांचा असतो.
वाजपेय या सोम यागासाठी १२ दिवसांचा कालावधी आवश्यक असतो.
सोम यागासाठी ब्रह्म वृंद
-
अग्निहोत्री यजमान
-
आहिताग्नी - २
-
अग्निहोत्री यजमान पत्नी
-----------------
-
अध्वर्यू
-
होता
-
ब्रह्मा
-
उद्गाता
-
सोमप्रवाक
—————
-
प्रतिप्रस्थाता
-
नेष्टा
-
उन्नेता
-
मैत्रावरुण
-
अच्छावाक
-
ग्रावस्तुत
-
ब्राह्मणाच्छांसी
-
आग्निध्र
-
पोता
-
प्रस्तोता
-
प्रतिहर्ता
-
सुब्रमण्यम्
——————
व्यवस्थापन
—————
-
चमसाध्वर्यू
—————
सोम यागासाठी लागणारे साहित्य
१) सोमवल्ली
२) लाकडी पात्रे
३) धातु पात्रे
४) माती पात्रे
५) दगडी पात्रे
६) दर्भ
७) समिधा
८) देशी गाईचे तुप
९) मधुपर्क
-
धोतर उपरणी
-
छारी
-
आसन
१०) दीक्षा वस्त्र
-
यजमान पत्नी रेशमी पोशाख
११) हिरण्य
-
प्रवर्ग्य रुक्म
१२) रजत
-
व्रत पात्र
-
प्रवर्ग्य रुक्म
१३) इंधन ( लाकडे )
१४) गोवरी शेणी - १००० नग
१५) अन्य साहित्य
-
४० जणांची ब्रह्म वृंदांची स्वतंत्र भोजन आणि निवास व्यवस्था ( ७ दिवस ४० जणांचे, नाष्टा , दु भोजन, रात्री भोजन, चहा कॅाफी इ . )
-
व्यवस्थापन टीम - २० जणांची स्वतंत्र भोजन आणि निवास व्यवस्था
-
वैदिक यजमान - स्वतंत्र निवास व्यवस्था
यज्ञशाळेसाठी लागणारी जागा आणि साहित्य
-
यज्ञ शाळा ( पश्चिम- पूर्व १२० फूट , दक्षिण- उत्तर १२० फूट जागा एक समान लेवल असावी. )
-
यज्ञ कुंड निर्मिती साठी विटा २००० नग , माती एक बैलगाडी, शेण यज्ञशाळा सारवणासाठी ४ बैलगाडी, गवंडी व सहकारी ४-५
-
मुबलक पाण्याची व्यवस्था
-
यज्ञ समाप्ती दिवशी यज्ञ शाळेपासून दोन किमी परिसरात अवघृत स्नानासाठी वाहती नदी, पाण्याचा मोठा प्रवाह किंवा मोठा तलाव
-
साउंड सिस्टम आणि माईक
-
इलेक्ट्रिसिटी लाईट - जनरेटर
-
सुरक्षा व्यवस्था
-
यज्ञ मंडप
-
दर्शनार्थींसाठी 500 खुर्च्या - बसण्याची व्यवस्था - बैठका - सतरंज्या
-
एक दूध देणारी शेळी
-
देशी गाय आणि वासरू
-
एक घोडा
-
यज्ञाची माहिती देणारे प्रदर्शन उभे करण्यासाठी जागा
-
रोज दुपारी किमान 500 ते 1000 लोकांना प्रसाद किंवा भोजन देण्याची व्यवस्था आणि रात्री 300 ते 500 लोकांना भोजन देण्याची व्यवस्था
-
यज्ञ समाप्ती दिवशी भंडारा - किमान 4000 ते 5000 लोकांना भोजन देण्याची व्यवस्था







एका वर्षात सोमयागाचे किती मुहूर्त असतात ?
सोमयाग यज्ञ मुख्यतः उत्तरायणा मध्ये म्हणजे जानेवारी ते जून - जुलै या दरम्यान आयोजित करता येतात. एका उत्तरायणा मध्ये सुमारे 15 ते 18 मुहूर्त असतात. एका सोमयागासाठी सहा दिवसांचा कालावधी लागतो. दक्षिणायणामध्ये अश्विन आणि कार्तिक महिन्यात - शरद ऋतूमध्ये जास्तीत जास्त चार मुहूर्त असतात आणि त्यावेळी फक्त वाजपेय हाच सोमयाग करता येतो. त्याचा कालावधी बारा दिवस असतो.
एका सोमयागासाठी येणारा अंदाजे खर्च:
सोमयाग कालावधी: 6 दिवस
-
यज्ञीय साहित्य - रु. 7,50,000/-
-
ब्रह्मवृंद मानधन व इतर खर्च - रु. 7,50,000/-
-
यज्ञ मंडप उभारणी व इतर खर्च - अंदाजे रु. 7,50,000/-
-
अन्नदान भंडारा - 6 दिवस - अंदाजे रु. 7,50,000/-