

भीष्म १०८ सोमयाग प्रकल्प

सोमयाग यज्ञासाठी यजमान
सोमयाग यज्ञाचे आयोजन हा एक भव्य दिव्य असा सोहळा आणि उपक्रम असतो. त्यासाठी अनेक व्यक्तींनी, व्यक्तिसमूहांनी सोमयाग यज्ञाच्या आयोजनात सहकार्य करणे आवश्यक असते. समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींच्या योगदानाने सोमयाग यज्ञ संपन्न होत असतो. यासाठी सहाय्य करणाऱ्या व्यक्तींना सोमयाग यजमान असे म्हटले जाते आणि त्यांच्या प्रतिनिधीला मुख्य यजमान असे म्हटले जाते. सोमयाग यज्ञामध्ये प्रत्येकाने तन, मन, धन पूर्वक सहभागी होणे ही एक अद्भुत अनुभूती असते. सोमयागा मध्ये भाग घेतलेल्या किंवा सहयोग केलेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अत्यंत विलक्षण असे प्रसंग घडतात आणि अनुभूती प्राप्त होतात. अशी हजारो उदाहरणे आहेत. सोमयाग यजमान यांचे महत्त्व वैदिक यजमान यांच्या एवढेच महत्त्वपूर्ण आहे.
सोमयाग यज्ञामध्ये आपण कसा सहयोग देऊ शकता ? कसे सहभागी होऊ शकता ?
-
सोमयाग यजमान
-
सोमयाग संलग्न विविध याग यजमान
-
सोमयाग यज्ञ अन्नदान
-
सोमवल्ली, यज्ञीय घृत आणि समिधा सेवा
-
सोमयाग यज्ञीय सेवा
-
आश्रयदाता भीष्म 108 सोमयाग यज्ञ प्रकल्प
-
महा आश्रयदाता भीष्म 108 सोमयाग यज्ञ प्रकल्प
सोमयाग यजमान
सोमयाग यजमान म्हणून आपण सोमयाग यज्ञासाठी प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन किंवा संकल्प करून सहभागी होऊ शकता. सोमयाग यजमान म्हणून नोंदणी करताना आपले नाव आणि गोत्र यांची माहिती देणे आवश्यक असते. सोमयाग यज्ञ संकल्पामध्ये प्रत्येक यजमानाचे नाव आणि गोत्र यांचे उच्चारण केले जाईल. जे यजमान प्रत्यक्ष उपस्थित राहणार असतील, त्यांना यज्ञ ठिकाणाच्या जवळपास असलेल्या हॉटेल्स ठिकाणी स्वखर्चाने राहता येईल.
प्रत्येक यज्ञ स्थळांच्या जवळपास असणाऱ्या हॉटेल्स ची नावे, लोकेशन आणि संपर्क क्रमांक त्या त्या यज्ञ स्थळाच्या लिंक वर दिलेली आहेत. सोमयाग यजमान नोंदणी करण्यासाठी
रुपये 21,000/- ( रुपये एकवीस हजार फक्त ) किंवा अधिक देणगी रक्कम अपेक्षित आहे.
सोमयाग संलग्न विविध याग यजमान
सोमयाग महायज्ञा बरोबरच सहा दिवसांच्या कालावधीमध्ये विविध देवी देवतांचे यज्ञ केले जातात.
उदा.
1. नवचंडी याग 2. रुद्र याग
3. विष्णू याग 4. गणेश याग
5. सौर ( सूर्य देवता ) याग 6. धन्वंतरी आरोग्य याग
या देवता यज्ञांमध्ये आपल्याला प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन सहभागी होता येईल. तसेच सोमयाग संलग्न विविध याग यजमान नोंदणी करण्यासाठी
रुपये 5001/- ( रुपये पाच हजार एक फक्त ) एवढी देणगी रक्कम अपेक्षित आहे.
सोमयाग यज्ञ अन्नदान
सोमयाग यज्ञा दरम्यान सहा दिवसांमध्ये दररोज शेकडो भाविक भक्त यज्ञ स्थळी भेट देऊन सोमयज्ञाचे दर्शन घेत असतात. तसेच यज्ञ शाळेभोवती प्रदक्षिणा करतात. या सर्वांसाठी सोमयाग यज्ञा दरम्यान अन्नदान प्रसाद सेवा सातत्याने सुरू असते. अन्नदान हे कलियुगातील सर्वात पुण्यदायक आणि फलदायी असे दान आहे. प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे सोमयाग यज्ञासाठी अन्नदान करावे अशी विनंती आहे. अन्नदानासाठी किमान देणगी रक्कम
रुपये 2100/- ( रुपये एकवीसशे फक्त ) किंवा त्याहून अधिक अशी आहे.
सोमवल्ली, यज्ञीय घृत आणि समिधा सेवा
सोमयाग यज्ञामध्ये सोमवल्ली या दैवी वनस्पतीचा रस यज्ञीय आहुती म्हणून अर्पण केला जातो. त्याचबरोबर देशी गाईचे तूप या यज्ञामध्ये वापरले जाते. तसेच विविध वृक्षांच्या समिधा आणि लाकडी पात्रे यांचा उपयोग केला जातो. हे दान अत्यंत पुण्यकारक आहे असे मानले जाते. त्यासाठी आपण योगदान देऊ शकता.
यासाठी देणगी रक्कम
रुपये 21,000/- ( रुपये एकवीस हजार फक्त ) किंवा अधिक इतकी असेल.
सोमयाग यज्ञीय सेवा
सोमयाग यज्ञाचे आयोजन हा एक दैवी संकल्प असतो. या यज्ञामध्ये तन, मन, धन अशा सर्व प्रकारे सहभागी होणे ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. यज्ञीय सेवा म्हणून आपण या यज्ञामध्ये सेवा सहयोग द्यावा अशी विनंती आहे. त्यासाठी देणगी शुल्क
रुपये 5001/- ( रुपये पाच हजार एक फक्त ) किंवा अधिक असे आहे.
-
सोमयाग यज्ञासाठीची देणगी रक्कम आपल्याला ऑनलाइन बँक ट्रान्सफर किंवा पेमेंट गेटवे द्वारे पाठवता येईल.
-
भारताबाहेरून इतर देशातून पेपाल वरून देणगी रक्कम अदा करता येईल.
-
प्रत्येक यजमान आणि यज्ञीय सेवेमध्ये सहभागी होणाऱ्यांना सोमयागातील पवित्र रक्षा अर्थात विभूती आणि प्रसाद हे कुरिअरने त्यांच्या पत्त्यावर पाठवण्यात येईल.
-
आपल्याला एका सोमयाग यज्ञा मध्ये वरील प्रकारे सहयोग देता येईल.
-
त्याचबरोबर भीष्म 108 सोमयाग यज्ञ प्रकल्पाच्या 108 सोमयाग यज्ञांसाठीही आपल्याला सहयोग देता येईल.
विशेष यज्ञ सेवा सहयोग
ज्यांना शक्य आहे त्यांनी भीष्म 108 सोमयाग यज्ञ प्रकल्पासाठी विशेष यज्ञ सेवा सहयोग द्यावा अशी विनंती आहे.
-
आश्रयदाता - एका सोमयाग यज्ञासाठी रु. 1,00,000/- ( रुपये एक लक्ष फक्त ) देणगी देऊन आपण भीष्म 108 सोमयाग यज्ञ प्रकल्पाचे आश्रयदाता व्हावे अशी विनंती आहे.
-
महा आश्रयदाता - भीष्म 108 सोमयाग यज्ञ प्रकल्पातील सर्व 108 सोमयाग यज्ञासाठी रु. 1,00,00,000/- ( रुपये एक कोटी फक्त ) देणगी देऊन आपण भीष्म 108 सोमयाग प्रकल्पाचे महा आश्रयदाता व्हावे अशी विनंती आहे.
क्र | सेवा | भारतातील यजमान | भारताबाहेरील यजमान |
|---|---|---|---|
1 | सोमयाग यजमान | ₹21,000/- | $ 300 |
2 | नवचंडी होम यजमान | ₹5,000/- | $ 101 |
3 | रुद्रयाग यजमान | ₹5,000/- | $ 101 |
4 | विष्णुयाग / दत्तयाग यजमान | ₹5,000/- | $ 101 |
5 | धन्वंतरी आरोग्य याग यजमान | ₹5,000/- | $ 101 |
6 | गणेश याग यजमान | ₹5,000/- | $ 101 |
7 | अन्नदान |